माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 1 August 2025

भाषिक सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) ' साक्षर ' म्हणजे काय ?
उत्तर -- लिहिणे - वाचणे येत असलेला.
---------------
(२) ' हुतात्मा ' म्हणजे काय ?
उत्तर -- देशासाठी आपले प्राण अर्पण करणारा.
----------------
(३) ' शिल्प ' म्हणजे काय ?
उत्तर -- दगडावर केलेले कोरीव काम.
--------------------------------------
(४) ' मदारी ' म्हणजे काय ?
उत्तर -- माकडाचा खेळ करणारा.
--------------------------------------
(५) ' बेट ' म्हणजे काय ?
उत्तर -- चार बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
--------------------------------------
(६) ' बोगदा ' म्हणजे काय ?
उत्तर -- डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता.
--------------------------------------
(७) ' तबेला ' म्हणजे काय ?
उत्तर -- घोडे बांधण्याची जागा.
--------------------------------------
(८) ' झावळ्या ' म्हणजे काय ?
उत्तर -- नारळाच्या झाडाची पाने.
--------------------------------------
(९) ' जलचर ' म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यात राहणारे प्राणी.
--------------------------------------
(१०) ' गारूडी ' म्हणजे काय ?
उत्तर -- सापाचा खेळ करणारा.
--------------------------------------
(११) ' चावडी ' म्हणजे काय ?
उत्तर -- गावाच्या न्यायनिवाड्याची जागा.
--------------------------------------
(१२) ' टाकसाळ ' म्हणजे काय ?
उत्तर -- नाणी पाडण्याची जागा.
--------------------------------------
(१३) ' चौक ' म्हणजे काय ?
उत्तर -- चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
--------------------------------------
(१४) ' तिठा ' म्हणजे काय ?
उत्तर -- तीन रस्ते एकत्र येतात ती जागा.
--------------------------------------
(१५) ' दरवेशी ' म्हणजे काय ?
उत्तर -- अस्वलाचा खेळ करणारा.
--------------------------------------
(१६) ' धर्मांतर ' म्हणजे काय ?
उत्तर -- एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे.
--------------------------------------
(१७) ' पंधरवडा ' म्हणजे काय ?
उत्तर -- पंधरा दिवसांचा काळ.
--------------------------------------
(१८) ' पाणवठा ' म्हणजे काय ?
उत्तर -- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.
--------------------------------------
(१९) ' पहाट ' म्हणजे काय ?
उत्तर -- सुर्योदयापूर्वीचा सुरूवातीचा काळ.
--------------------------------------
(२०) ' विधवा ' म्हणजे काय ?
उत्तर -- जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री.
--------------------------------------
(२१) ' संगम ' म्हणजे काय ?
उत्तर -- दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण.
--------------------------------------
(२२) ' धबधबा ' म्हणजे काय ?
उत्तर --- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह.
--------------------------------------
(२३) ' तुरूंग ' म्हणजे काय ?
उत्तर -- कैदी ठेवण्याची जागा.
--------------------------------------
(२४) ' निरक्षर ' म्हणजे काय ?
उत्तर -- लिहिता - वाचता न येणारा.
--------------------------------------
(२५) ' व-हाडी ' म्हणजे काय ?
उत्तर -- लग्नासाठी जमलेले लोक.
===========================
संकलक / लेखन :-
शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Tuesday, 29 July 2025

गणितीय प्रश्नावली

(1) 1 ते 10 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 55
--------------------
(2) 11 ते 20 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --- 155
---------------------
(3) 21 ते 30 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 255
--------------------------
(4) 31 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 355
------------------------------
(5) 41 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 455
-----------------------------
(6) 51 ते 60 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 555
---------------------------
(7) 61 ते 70 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 655
---------------------------
(8) 71 ते 80 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 755
--------------------------
(9) 81 ते 90 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 855
------------------------
(10) 91 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 955
------------------------
(11) 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 5050
==============================
संकलक/ लेखन :- 
शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775 / 7721941496

Monday, 28 July 2025

निबंध लेखन ( पावसाळा / मोर )

(१) माझा आवडता ऋतू -- पावसाळा 

      पावसाळा ऋतू मला आवडतो. पावसामुळे सर्व 
सृष्टी हिरवीगार होते. पाऊस पडला की नदी, नाले, 
ओढे वाहू लागतात. झाडे पाण्याने आंघोळ करतात. पशुपक्ष्यांना आनंद होतो. पाऊस पडला की शेतकऱ्यांना आनंद होतो. पावसामुळे शेतात धान्य पिकते.

      पशुपक्ष्यांना, माणसांना व सर्व निसर्गाला पाण्याची खूप गरज असते. पावसामुळे पृथ्वीवरील जीवन सुरू आहे. पाऊस नसेल, तर सर्व सृष्टी उजाड व भकास होईल. म्हणूनच पाण्याला 'जीवन' म्हटले आहे. मला पावसात भिजायला खूप आवडते. 
=============================

(२) माझा आवडता पक्षी -- मोर 

    ‌ मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये मला मोर खूप आवडतो. मोराचा पिसारा डौलदार असतो. मोराच्या पिसाऱ्यातील हिरवा व निळा रंग खुलून दिसतो. मोराच्या डोक्यावर ऐटबाज तुरा असतो.

     ‌ आकाशात काळे पावसाळी ढग दाटून आले की 
मोर रानामध्ये थुई थुई नाचू लागतो. त्यावेळी तो त्याचा पिसारा फुलवून नाचतो. नाचताना मोर खूप सुंदर दिसतो. पावसाळी ढगांकडे पाहून मोर आनंदाने ओरडतो, त्याला केकारव म्हणतात. असा हा दिमाखदार, सुंदर पक्षी माझा आवडता पक्षी आहे.
=========================
शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६